चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Foto
वैजापूर, (प्रतिनिधी) : घरगुती वादातून भावास दांड्याने मारहाण केल्याची घटना तालुक्यातील आघूर येथे सोमवारी सकाळी घडली. या प्रकरणी चार जणांविरुद्ध पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आघूर येथील पोपट मधुकर शिंदे व रमेश मधुकर शिंदे हे भाऊ आहेत. या दोघांमध्ये घरगुती वाद आहे. पोपट यांचा मुलगा घराबाहेर उभा असताना रमेश तेथे आला. तु चुलता नवनाथ यांच्या घरी का जातो असे म्हणून त्यांनी मुलाशी भांडण केले. हे भांडण सोडवण्यासाठी पोपट हे गेले असता त्यांना दांड्याने मारहाण करून जखमी करण्यात आले.

 याप्रकरणी पोपट शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रमेश शिंदे, नितीन मधुकर शिंदे, मधुकर कारभारी शिंदे व योगिता रमेश शिंदे सर्व रा.  आघूर या चार जणांविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार किसन गवळी करीत आहेत.